अशी बदला 2 हजाराची नोट; काय असतील नियम
मुंबई – आरबीआय बँकेने 19 मे रोजी 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा करा अशा सुचना केल्या होत्या. त्यानुसार आज म्हणजे मंगळवारी (दि.23) पासून बँकेत नोटा बदून मिळणार आहेत. यावेळी, नोटाबंदीमुळे बँकेबाहेर लांबच लांब रांगा दिसण्याची शक्यता फार कमी आहे, कारण आरबीआयने लोकांना 2 हजाराची नोट बदलण्यासाठी एक, दोन नाहीतर तब्बल 4 महिन्यांची मुदत दिली आहे. त्यानुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नागरिकांना नोटा बदलून मिळणार आहेत. मात्र त्यासाठी काय काय नियम असतील ते पुढील प्रमाणे
1) आरबीआयनं आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, नोट चलनातून बाहेर काढली जात आहे. ती बंद केलेली नाही,नोट पूर्णपणे वैध आहे. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी खरेदी, व्यवहार यासाठी तुम्ही या नोटा वापरू शकता. तसेच, दोन हजारांची नोट घेणं कोणीही नाकारू शकत नाही.
2)नागरिक बँकेच्या कोमत्याही शाखेत जाऊन ती बदलून घेऊ शकतात. बँकेत 20 हजार रुपयांपर्यंत म्हणजेच, एका दिवसात 10 नोटा बदलू शकता.
3) नोट बदलण्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. बँकेत जाऊन तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय सहज नोटा बदलू शकता. बँकेचे कर्मचारी किंवा अधिकारी तुमच्याकडून कोणतंही शुल्क मागू शकत नाहीत. बँकेनं नोट बदलण्याची सेवा पूर्णपणे मोफत ठेवली आहे.
4)ज्यांचं बँक खातं नाही ते देखील नोट बदलू शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक खात्याची गरज नाही, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.
5) बँक शाखांमध्ये जाऊन लोक 2000 च्या नोटा त्यांच्या खात्यात जमा करू शकतात. याशिवाय आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध असेल.
6) जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात 2 हजाराची नोट जमा केली तर त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या बँक खात्यात तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे जमा करू शकता. बँकिंग डिपॉझिट नियमांनुसार, तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर तुमचे पॅन-आधार कार्ड दाखवावे लागेल.
7) बँकेच्या कामकाजाच्या वेळेदरम्यान बँकेत जाऊन कधीही तुमची नोट बदलू शकता.
8) तुम्ही कोणत्याही निर्बंधाशिवाय खात्यात पैसे जमा करू शकता. नोट बँक खात्यात जमा करता येते. डिपॉझिट केल्यानंतर तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता.
9) जर तुम्हाला बँकेनं ही नोट स्वीकारण्यास किंवा जमा करण्यास नकार दिला तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. ही नोट अजूनही चलनात असल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. अशा परिस्थितीत ही नोट घेण्यास कोणी नकार दिल्यास त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
10) नोट बदलण्यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. लोक बँकेत जाऊन थेट नोटा बदलून घेऊ शकतात.
11) ज्यांचं बँकेत खातं नाही अशा लोकांकडून 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, ग्रामीण बँक अशा ग्राहकांकडून ओळखपत्र मागू शकतात.
12) आरबीआयनं म्हटलं आहे की, नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहतील.
13) बँकांनी वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकांकडूनच देण्यात आल्या आहेत.
14) 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा जमा करू शकणार नाहीत, त्यांना RBI कार्यालयात जाऊन त्या बदलून घ्याव्या लागतील. मात्र, आरबीआयनं याबाबत अद्याप कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं दिलेली नाहीत.