आईने बोलावल्याचे सांगून घरी नेले अन्; 17 वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

बोलावल्याचे सांगून घरी नेले अन्; 17 वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक प्रकार

पुणे – आईने भेटण्यासाठी घरी बोलावले असे सांगून 17 वर्षीय तरुणीला घरी गेले आणि जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार करण्यात आला. चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हाय स्ट्रीट जवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी संदीप शंकर धामणस्कर (वय 22, राहणार मनाली रेस्टॉरंट जवळ हाय स्टेट जवळ बालेवाडी गाव पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. 12 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने पिढीतील तुला माझ्या आईला भेटायचे आहे त्यासाठी तुला घरी बोलावले आहे असे सांगून तिला घरी घेऊन गेला. त्यानंतर घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने घराचा दरवाजा लावून घेत तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केले. चतु:र्श्रुंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply