शिरूर : टीम न्यू महाराष्ट्र
केंद्रातील सत्ता ही बदलत आहे आणि इंडिया आघाडीची सत्ता येत असल्याने केंद्रात सत्तेतील खासदार निवडून द्या हे विधान करून आढळराव यांनी आपला पराभव मान्य केला असल्याचा टोला खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला. खोट बोल पण रेटून बोल या सवयीबरोबरच पंधरा वर्षांच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टिका केली जात असल्याचेही कोल्हे यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, दिलीप पवळे, सुनील तोत्रे, मनीषा तोत्रे, निलेश वळसे, पुजा वळसे, विजय शेटे आदी उपस्थित होते.
२०२४ ची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, या निवडणुक प्रचारात धोरणात्मक मुद्दांवर बोललं जाईल ही अपेक्षा होती. मात्र, खोट बोल पण रेटून बोल या सवयीबरोबरच पंधरा वर्षांच्या अपयशाची पोटदुखी होत असल्याने वैयक्तिक टिका केली जात असल्याचं प्रतिउत्तर डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना दिला. डॉ. कोल्हे यांच्यावर आढळराव पाटलांकडुन सातत्याने वैयक्तिक टिका केली जातीये. त्यावर प्रतिउत्तर देताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत धोरणात्मक बाबींवर बोलावं, पण त्यांच्याकडे वेगळे मुद्देच नाहीत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे तीच तीच वाक्य फिरवून ते बोलतायत. पंधरा वर्षातल त्यांचं अपयश आहे. पाच वर्षात शेतकऱ्यांच्या पोराने काम मार्गी लावली त्याची ही पोटदुखी आहे, असा टोला ही डॉ. कोल्हे यांनी लगावला.