महापालिकेचे आरोग्य विभाग, सांगवी वैद्यकीय विभाग, कीटक नाशक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मलेरिया दिन’ साजरा करण्यात आला
पिंपरी – महापालिकेचे आरोग्य विभाग, सांगवी वैद्यकीय विभाग, कीटक नाशक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक मलेरिया दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त कीटक नाशक शास्त्रीय सर्व्हेक्षण करण्यात आले. हे सर्व्हेक्षण दापोडी येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मध्यवर्ती कार्यशाळा येथे करण्यात आले. या ठिकाणी डास उत्पत्ती स्थानकांची पाहणी करण्यात आली. औषधोपचार फवारणी करण्यात आली. तसेच या कार्यशाळेतील अधिकारी, कर्मचारी यांना डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया, झिका व्हायरस या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.
येथील परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकणगुणिया, झिका व्हायरस, हिवताप पसरवणाऱ्या आजाराची लक्षणे उद्भवण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभाग, सांगवी वैद्यकीय विभाग अंतर्गत येथील कार्यशाळेत जनजागृती करण्यात आली. यामध्ये डास कशामुळे होतात, डासांची उत्पत्ती होऊ नये. यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत, डासांची उत्पत्ती कशी होते, स्वतःची काळजी कशी घ्यावी, लक्षणे काय होतात, उपचार काय करायला हवेत. आजार होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत संपूर्ण एसटी उभारली जाते. यावेळी या कार्यशाळेमध्ये टायर, पत्रे आदी जुनी, नवी सामग्री उपलब्ध असतात. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणात होऊ शकते. यावेळी या ठिकाणी औषधोपचार फवारणी करण्यात आली. तसेच प्रशासन विभाग, कोच विभाग, इंजिन विभाग, टायर विभाग आदी परिसराची पाहणी करून आवश्यकतेनुसार औषध फवारणी करण्यात आली. विभागातील सर्व अधिकारी व शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांनी डास निर्मूलनाची याप्रसंगी प्रतिज्ञा घेतली.
यावेळी कार्यशाळा व्यवस्थापक दत्तात्रय चिकोर्डे, सहाय्यक अधिकारी शुभांगी धुमाळ, कार्यशाळेच्या वैद्यकीय अधिकारी आयेशा इनामदार याप्रसंगी उपस्थित होते. तसेच महापालिकेचे सांगवी विभाग ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सागळे, डॉ. कुंदन पाटील, डॉ. बिरादार, गणेश जवळकर, सचिन घनवट, अर्जुन नागरगोजे, माणिक चव्हाण, रुपाली घुले, प्रभाग ३० मधील कीटकनाशक टीम यांनी या ठिकाणी डेंग्यू , चिकनगुणिया व झिका याविषयावर मलेरिया जागतिक दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली.
महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच सांगवी वैद्यकीय विभाग अंतर्गत जागतिक मलेरिया दिनानिमित्त येथील कार्यशाळेला भेट देऊन डासांच्या उत्पत्ती बाबत होणाऱ्या आजाराचे, उपाययोजनेचे, आजारांची लक्षणे, याबाबत घ्यावयाची काळजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन जनजागृती उत्तमरीत्या करण्यात आली.
दत्तात्रय चिकोर्डे, कार्यशाळा व्यवस्थापक
ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी तृप्ती सागळे म्हणाल्या
महापालिकेच्या वतीने पावसाळ्यात शहर परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, डेंग्यू, मलेरिया, हिवताप, चिकणगुणिया, झिका या आजारापासून संरक्षण कसे करता येईल यासाठी नागरिकांना, ऑफिस, कारखाने आदी ठिकाणी जागतिक मलेरिया दिनानिमित्त जनजागृती करण्यात येत आहे.