‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू : दीपक केसरकर
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश योजना’ लागू करणार अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
१५ जून पासून यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शाळा सुरू होण्यास अवघा एक महिना बाकी असताना अद्याप शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व सरकारी शाळांबाबत ‘एक रंग एक गणवेश’ धोरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला आहे. या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळा व्यवस्थापन आणि अधिकाऱ्यांसोबत ११ मे रोजी बैठक घेतल्यानंतर याबाबत माहिती दिली आली आहे.
केसरकर म्हणाले की, “आता खासगी शाळांनीही विचार करावा लागेल. याबाबत शैक्षणिक संस्थांसोबत बैठक घेणार आहे. त्यांनाही आम्ही मोफत पुस्तक व गणवेश देण्यात येणार आहे. एक गणवेश करण्यामागे शिस्त लागते. या एक गणवेशामागे कुठलाही आर्थिक हेतू नाही. चुकीचा गैसमज परवला जात आहे. यासाठी कंत्राट निघणार कुणीही त्यात भाग घेऊ शकते. याबाबत कुठल्याही कंपनीशी संगणमत नाही. मुलांना दर्जेदार कपडे मिळतील बुट मिळतील राज्यातील शासकिय शाळांकडे मुलाची ओढ वाढेल”, असेही त्यांना सांगितले.