एस. बी. पाटील स्कूलमधील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्ट संचालित एस.बी. पाटील पब्लिक स्कूल, रावेत शाळेतील एकूण 199 विद्यार्थ्यांपैकी 70 विद्यार्थी 91% वर गुण मिळवण्यात यशस्वी झाले, 81% ते 90% मध्ये गुण मिळवण्यास 67 विद्यार्थी यशस्वी झाले.

टक्केवारीनुसार प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी मानकरी अनिरुद्ध गुप्ता 98.6%, धवला पाटील – 98%, मानस सानप – 97.8%, अद्विता कुरले 97.6% , आदित्य ठोंबरे 97.6%, हर्षवर्धन निमणकर 96.8%, शिवम फुलपगारे 96.8% ठरले.

याशिवाय हर्षवर्धन निमणकर, सायना जोशी, वेदांत घोटावडेकर, दर्शील माळी,
श्रेया तोते, देष्णा नेहेते  यांनी माहिती तंत्रज्ञान (IT) मधून 100 गुण मिळवले. अनिरुद्ध गुप्ता, चिन्मय चौधरी, अवनी बिबवे , रितिका भाटिया,त्रिपुरा मठ, या विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवस्थापन (FMM) या विषयात 100 गुण मिळवले. गणितात अनिरुद्ध गुप्ता, आदित्य ठोंबरे,अद्विता कुरले, धवला पाटील,
हर्षवर्धन निमणकर यांनी 100 गुण मिळवले. आर्यन भोसले सामाजिक शास्त्र ( S.Sci) या विषयात 100 गुण मिळवले.

एस बी पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर बिंदू सैनी, उपप्राचार्या
पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांच्या
मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त झाले. पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई
भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन
पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉक्टर
गिरीश देसाई यांनी  यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन  केले .

Share

Leave a Reply