खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तीन कोटींच्या कामांचे भूमीपूजन
मावळ: मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यातील विविध गावासाठी जिल्हा वार्षिक नियोजना अंतर्गत तीन कोटी रूपयांची विविध विकास कामे सुरु केली आहेत. साते, कान्हे, कामशेत, टाकवे, कार्ला, मळवली, पाटण येथील गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन खासदार बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार बारणे यांनी सर्वाधिक निधी मावळसाठी दिला असून विकासकामांचा धडाका सुरु आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब म्हाळसकर, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, प्रवीण चव्हाण, सुनील मोरे, विशाल हुलावळे, दिपक हुलावळे, सागर हुलावळे, धनंजय नवघणे, गिरीष सातकर, डॅा. विकेश मुथा, दत्ता केदारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे. डी. पाटील,साते गावच्या सरपंच आरती आगळमे, कान्ह्याचे सरपंच विजय सातकर, टाकवेचे सरपंच राकेश डमाले, मळवलीचे सरपंच अस्लम शेख, पाठवचे सरपंच प्रवीण तिकोने, कामशेतचे उपसरपंच दत्ता रावते उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांचे मावळ तालुक्यावर विशेष लक्ष्य आहे. मावळ तालुका वाड्या वस्त्यांमध्ये विस्तारला आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये दळणवळणासाठी रस्त्यांचा अभाव आहे. अंतर्गत रस्ते नाहीत. त्याकरिता खासदार बारणे यांनी जिल्हा वार्षिक निधीतून मावळ तालुक्यात तीन कोटींचा निधी मंजूर करुन घेतला. या विकास निधीतून अंतर्गत रस्ते, समाज मंदिराच्या कामांचे भूमीपूजन करण्यात आले. खासदार बारणे यांनी मावळ तालुक्याला सर्वाधिक निधी दिला आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळातील गावांमध्ये रस्ते करण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार मावळातील अनेक गावांमधील अंतर्गत रस्ते करण्यास प्राधान्य दिले. केंद्र, राज्य स्तरीय रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी आणला आहे. त्यातून गावांमध्ये रस्त्यांची कामे केली जात आहेत. गावपातळीवर राजकारणविरहित कामे केली जात आहेत. गावातील विकासांमध्ये राजकारण आणले जात नाही. सरपंच कोणत्या पक्षाचा आहे हे बघितले जात नाही. सर्व गावांना विकासासाठी समान निधी दिला जात आहे. ग्रामपंचायतीमधील सर्वांनी राजकारणापेक्षा एकत्र येवून गावाचा विकास करण्यावर भर द्यावा. गावपतळीवर राजकारण विरहित काम करावे. त्यामुळे गावाच्या विकासाला अधिक चालना मिळेल, असे मार्गदर्शनही त्यांनी केले.