चक्क मृत व्यक्तीच्या खात्यातून 39 लाख वळविले

पिंपरी – मयत वींग कमांडरच्या बँक खात्या वरून ड्रायव्हरने परस्पर 39 लाख 87 हजार लंपास केले आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हा प्रकार बावधन येथे ऑगस्ट 2017 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत घडला.

 

याप्रकरणी अमितवा अरुणकुमार पाल (वय 48 रा.विमाननगर) यांनी फिर्याद दिली असून करण भाऊसाहेब पाटील (वय 26 रा. कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल निवृत्त विंग कमांडर अरुण कुमार पाल यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या ड्रायव्हर करण याने विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने अरुणकुमार यांचे एटिएम कार्ड, चेकबुक, कारइतर गोष्टींचा गैरवापर कर परस्पर अरुण कुमार यांच्या खात्यातून 39 लाख 87 हजार, 984 रुपये काढून घेत फसवणूक केली. हि फसवणूक समोर येताच कंमार यांच्या घरच्यांनी पोलीसांकडे धाव घेतली.यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share

Leave a Reply