चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटलांचे व्यक्तिमत्व, ईडी चौकशीवर पवारांची प्रतिक्रिया

चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटलांचे व्यक्तिमत्व, ईडी चौकशीवर पवारांची प्रतिक्रिया

मुंबई – महाराष्ट्रात चांगले काम करणारे प्रशासक असे जयंत पाटील यांचे व्यक्तिमत्व आहे. आज त्यांना कशासाठी बोलावले याची कल्पना नाही. पण त्यांच्यासाठी ईडीची यातना होतोय. याचा अर्थ या संस्थांचा गैरवापर कसा होतो याच हे उदाहरण आहे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पवारांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले की, आमचाकडे जी यादी आहे. त्यानुसार राष्ट्रवादीच्या महत्वाचा १० लोकांना बोलावले गेले. काही लोकांवर कारवाई झाली. अनिल देशमुखांवर एका शैक्षणिक संस्थेकडून १०० कोटी घेतले असल्याचा आरोप केला होता. मात्र, जे आरोप पत्रात दाखल केले त्यात ती रक्कम २० कोटीवर आली. त्यामुळे अतिरंजित आरोप केले जातात. बदनामी करण्याचे काम केलं. आता सांगता रक्कम तितकी नाही. त्यांचा शैक्षणिक संस्थेला देणगी दिलेली आहे, असेही पवार यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या ९-१० लोकांना या ना त्या पद्धतीने त्रास देण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांची अपेक्षा असण्याची सशक्याता नाकारता येत नाही. राष्ट्रवीदीच्या सहकराऱ्यांकडून सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा आहेत. मात्र, त्यांचा अपेक्षा पुर्ण करण्याची आमची तयारी नाही. काय यातना होतील त्या आम्ही सहन करू. परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे घेण्यात आले. ठाण्यात किती केसेस झाल्या. या सगळ्यांचा खोलात गेल्यानंतर असे कळते की, चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण आणि चांगल्या लोकांना त्रास हे आत्ताच्या सरकारचे धोरण आहे, असेही शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.

Share

Leave a Reply