पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. 13) मतदान झाले. मतदानाच्या पूर्वसंध्येला चिखलीत गोळीबाराची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली. मतदानाच्या आदल्या दिवशी गोळीबार झाल्याने या घटनेला राजकीय किनार आहे का, अशी चर्चा होत असतानाच पोलिसांनी आरोपींना अटक करत हा प्रकार केवळ व्यावसायिक वादातून असल्याचे तसेच याला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे स्पष्ट केले.
हर्शल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली), शामलिंग चौधरी (रा. मोशी), कीर्तीकुमार लिलारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अजय सुनील फुले (वय 19,रा. मोहननगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अजय फुले आणि हर्शल सोनवणे या दोघांचे जाधववाडी परिसरात गॅस शेगड्या दुरुस्तीची दुकाने आहेत. एकमेकांच्या दुकानातील गिऱ्हाईक तोडण्यावरून मागील सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद होते. वारंवार त्यांच्यात बाचाबाची देखील होत असे. 12 मे रोजी हर्शल याने त्याच्या दोन साथीदारांना अजय यांच्या दुकानावर पाठवले. वाद मिटविण्यासाठी अजय यांना जाधववाडी ते पंतनगर रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ बोलावून घेतले. तिथे चर्चा करत असताना हर्शल याने नियोजित कटानुसार पिस्तुल काढून त्यातून तीन गोळ्या झाल्या.
त्यातील एक गोळी अजय यांच्या दंडाला लागली आणि ते जखमी झाले. तसेच हर्शल याने झालेली एक गोळी त्याचाच साथीदार कीर्तीकुमार याच्या मानेला लागली. कीर्तीकुमार देखील गंभीर जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस, गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी अजय याला पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अजयने आपल्यावर गोळीबार करणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ तीन) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरक्ष कुंभार, चिखलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस उपनिरीक्षक महेश मुळीक, दत्तात्रय मोरे, सहायक फौजदार वाडेकर, कडलग, बाबा गर्जे, संदीप मसाळ, विश्वास नाणेकर, चेतन सावंत, आनंदा नांगरे, भास्कर तारळकर, सुनील शिंदे, अमर कांबळे, कबीर पिंजारी, संदीप राठोड, गुन्हे शाखेचे बोऱ्हाडे, जावळे, महाले, अजित रूपनवर, जायभाये यांनी केली.
————-
आरोपींना शोधण्याचे आव्हान
आरोपींना शोधण्याचे आव्हान
मतदानाच्या आदल्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे आरोपींना अटक करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चिखली पोलीस तसेच गुन्हे शाखांना सूचना दिल्या. एक आरोपी जखमी झाला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्याचा अंदाज बांधून चिखली पोलिसांनी आरोपी कीर्तीकुमार याची माहिती डॉक्टरांच्या सोशल मिडीया ग्रुपवर पाठवली. त्यात पोलिसांना माहिती मिळाली की, पोलिसांनी पाठवलेल्या माहितीशी साधर्म्य असलेला आरोपी मोरवाडी पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यानुसार पोलिसांनी खासगी रुग्णालयात धाव घेत आरोपी कीर्तीकुमार याची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने देखील या गुन्ह्यातील एका आरोपीला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील शामलिंग चौधरी हा आरोपी देहूरोड येथे पळून गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देहूरोड परिसरातून शामलिंग याला ताब्यात घेतले.
—————-
सीसीटीव्ही फुटेजची पाहणी
गोळीबार करणारा मुख्य आरोपी हर्शल सोनवणे हा गुन्हा केल्यानंतर पळून गेला होता. त्याने त्याचा मोबाईल फोन देखील बंद केला होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हान होते. चिखली पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात आरोपी हर्शल कोणत्या दिशेने गेला याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या मार्गाचा माग काढला असता आरोपी हा चाकण येथे गेला असल्याचे समजले. पोलिसांनी नाणेकरवाडी चाकण मधून हर्शल याला ताब्यात घेतले.त्यानंतर आरोपींकडे चौकशी करत हा प्रकार केवळ व्यावसायिक वादातून झाला असून याला कोणतीही राजकीय किनार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
—————