जलप्रदूषणामुळे इंद्रायणी नदीतील मासे मृतावस्थेत
पिंपरी – इंद्रायणी नदीमध्ये होत असलेल्या विविध जलप्रदूषणा मुळे देहू येथील इंद्रायणी नदीमध्ये अनेक मासे मृतावस्थेत आढळले. इंद्रायणी जलप्रदूषण मुक्तीसाठी आळंदी मध्ये साखळी उपोषण करण्यात आले होते. याबाबत इंद्रायणी फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे यावेळी म्हणाले हे उपोषण इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात आले. प्रशासनाने 10 दिवसात त्या संदर्भात बैठक बोलवण्याचे लेखी पत्र दिले होते.अजूनही बैठक बोलवण्यात आलेली नाही.इंद्रायणीचे प्रदूषण त्यांनी अजूनही रोखले नाही. उलट देहू या गावामध्ये मासे मृत पडलेले आहेत याचे दोषी कोण? जलप्रदूषणामुळे जलचर सृष्टी धोक्यात येत असेल तर ते जलप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद कायद्यामध्ये आहे. त्याची अंमलबजावणी कधी करणार?असे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी.