जालना – गेल्या अनेक वर्षांपासून जालना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करावी अशी मागणी काही पक्षाकडून केली जात होती. दरम्यान, जालनाकरांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जालना नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर करण्यात आलं आहे.
राज्यात शिंदे सरकार येताच राज्याच्या उपसचिव विद्या हपय्या यांनी जालना जिल्हाधिकारी यांना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिंदे गटाचे माजी मंत्री अर्जुन यांनी जालना पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठी वर्षभरापूर्वी पाठपुरावा केला होता.