जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कंटेनर पलटी; वाहतुकीची प्रचंड कोंडी

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी बस स्टँडजवळ कंटेनर उलटल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी बराच वेळ अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच पुणे वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केली. वाहतूक सुरळीत करताना ट्वीटरवरून माहिती देताना वाहतूक पोलीसांनी सांगितले की, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्टँड येथे कंटेनर पलटी झाला असून एका लेनमधून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आलेली आहे.
Share

Leave a Reply