पिंपरी – तडीपार गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सात वाजता फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे करण्यात आली. चन्नाप्पा परशुराम सुतार (वय 22, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुतार याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी 5 ऑगस्ट 2021 रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात बेकायदेशीरपणे आला. त्याने त्याच्याकडे तलवार बाळगली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला तलवारीसह अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.