पिंपरी : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांनी कट रचल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आमदारावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून सहा जणांच्या टोळक्याने निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी पावणे दोनच्या सुमारास नगरपरिषदेच्या आवारात घडली होती. याप्रकरणी आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(सविस्तर वृत्त लवकरच……)