तामिळनाडू: येथील बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. त्यात एका विद्यार्थिनीने चक्क 100 टक्के गुण मिळवून विक्रम केला आहे. एस नंदिनी असे 100 पैकी 100 गुण मिळवलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
तामिनाडू येथील सरकारी परीक्षा संचालनालयाने नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. एस नंदिनीला तामिळ, इंग्रजी, अर्थशास्त्र, वाणिज्य, लेखा आणि कॉम्पुटर एप्लीकेशन्स अशा सहा विषयांमध्ये 100 पैकी 100 गुण मिळाले.
एस नंदिनी ही दिंडीगुल जिल्ह्यात राहते. ती अन्नामलैयार गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. तिचे वडील श्रवण कुमार हे मजुरीचे काम करतात. नंदिनीला पुढे सीएचे शिक्षण घेऊन ऑडीटर व्हायचे आहे.
नंदिनीने आपल्या यशाचे श्रेय तिच्या वडिलांना दिले. नंदिनीच्या या कामगिरीवर देशभर कौतुकाचा वर्षाव होत आहे. एवढेच नव्हे तर नंदिनी गुगलच्या ट्रेंडिंग मध्ये देखील झळकली आहे.