पुणे : टीम न्यू नेटवर्क
शासकीय दिव्यांग बालकगृह व शाळा मिरज या संस्थेत मोफत प्रवेशासाठी प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शाळेत दिव्यांग बालकांना मोफत शिक्षण, वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच दिव्यांगत्वावर निदान, उपचार व शस्त्रक्रिया करुन कृत्रिम अवयव बसविण्यात येतात. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकाकडील किमान 40 टक्के दिव्यांगत्वाचा दाखला असलेली हात व पायाने दिव्यांग असलेली अस्थिव्यंग प्रवर्गातील बालके प्रवेशासाठी पात्र आहेत. अधिक माहितीसाठी शासकीय दिव्यांग बालकगृह व शाळा, किल्ला भाग, भारत संचार निगम लि. कार्यालयाशेजारी मिरज या पत्त्यावर किंवा 0233-2222513, 9422216459, 9552097241 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शाळेच्या अधीक्षकांनी केले आहे.