‘द केरला स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करा – महेश लांडगे

देशात ‘लव्ह जिहाद’अंतर्गत हिंदू व ख्रिश्‍चन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलीच्या जीवनावर आधारित सत्य ‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात करमुक्त करावा, अशी मागणी भाजपा शहराध्‍यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

 

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारतात ‘लव जिहाद’ ला बळी पडलेल्या हिंदू व ख्रिश्चन मुलींचे वास्तव चित्रण करणारा ‘द केरला स्टोरी’ हा मध्यप्रदेश सरकारने करमुक्त केला आहे. या सिनेमामधील हिंदू समाजावरील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून आयुष्यातून कशा पद्धतीने उध्वस्त केले जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण केले आहे.

 

‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे लव्ह जिहादचे वास्तव खऱ्या अर्थाने उजेडात आले आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचवा. सदर चित्रपट प्रत्येकाने पहावा हा हेतू लक्षात घेऊन राज्य सरकारने या चित्रपटाला करमुक्त करावे, अशी आग्रही मागणी सर्व हिंदू समाज बांधवांच्या वतीने करीत आहोत.

Share

Leave a Reply