धोकादायक होर्डिंगमुळे दुर्घटना घडल्यास कॅंन्टोन्मेट बोर्ड जबाबदारी घेणार का ? शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख विजय थोरी यांचा सवाल

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

काही दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून त्यामध्ये १७ निष्पाप नागरिकांचा बळी गेला व अनेकांना दुखापत झाली. अशीच घटना मागील वर्षी किवळे मुकाई चौकात घडली होती.त्या घटनेतही ५ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अशा घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपआपल्या हद्दीत होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याच आदेश दिले होते.मात्र, देहूरोड कॅंन्टोमेंट बोर्ड हद्दीतील धोकादायक होर्डिंगवर अद्यापही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भविष्यात अशा होर्डिंमुळे दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेल्यास त्याची कॅंन्टोमेंट बोर्ड जबाबदारी घेणार आहे का?, असा सवाल ‌शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख विजय थोरी यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात थोरी यांनी नुकतेच देहूरोड कॅंन्टोमेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवदेन देऊन धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतही जोडली आहे. देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड परिसरामधील सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्याकरिता योग्य ती कार्यवाही करुन ते जप्त करावे.. तसेच पारशी चाळ, सवाना गार्डन हॉटल, थॉमस बाजार या इमारतींसह एम. बी. कॅम्प येथील पाण्याच्या टाकीशेजारील होर्डिंग धोकादायक आहे. त्याचबरोबर कॅंटोन्मेट बोर्ड हद्दीत इतर पुणे- मुंबई महामार्गासह अन्य ठिकाणीही धोकादाय होर्डिंगचे सांगाडे उभे आहेत. ते कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. संबंधीत धोकादायक होर्डिंगवर कारवाई करुन त्यांचे सांगाडे तात्काळ हटविण्याची मागणी विजय थोरी यांनी निवेदनात केली आहे.
———-

Share

Leave a Reply