पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र
नानचाकू असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नानचाकू स्पोर्टस् रेफ्री टेक्निकल सेमिनारमध्ये महाराष्ट्रातील 12 सदस्यांनी सहभाग घेतला.
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे नुकताच हा सेमिनार पार पडला. सेमिनारमध्ये देशातील 15 राज्ये सहभागी झाली. नानचाकू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सचिव दीपक शिर्के, स्वरूप एकावडे, बाळासाहेब बिडकर, अनिल शिंदे, श्वेता धनवडे, विजय कांबळे, दीपक भूतांबरे, वैष्णवी नवले, सृष्टी पिसाळ, जान्हवी शेलार, अभिनव जाधव, रिदम तिवारी यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. नानचाकू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. रोहित सक्सेना, विजय कपूर, सरचिटणीस बाबूल वर्मा, टेक्निकल डायरेक्टर आर पी शर्मा, टेक्निकल कमिशन विजय कुशवाह यांनी महाराष्ट्र टीमला प्रोत्साहन दिले
