न्यायपालिका कमकूवत होतेय’; 21 निवृत्त न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र

नवी दिल्ली- २१ निवृत्त न्यायाधीशांनी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना पत्र लिहिलं आहे. काही लोकांकडून न्यायपालिका कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप निवृत्त न्यायाधीशांनी केला आहे. याआधी काही दिग्गज वकिलांनी न्यायमूर्तींना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता निवृत्त न्यायमूर्तींनी पत्र लिहिलं आहे.

काही गट दबाव आणून, चुकीची माहिती देऊन आणि सार्वजनिक अपमान करुन न्यायपालिकेला कमकूवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. याप्रकरणी आम्ही आमची चिंता व्यक्त करतो. राजकीय हित आणि व्यक्तिगत लाभासाठी काही तत्व सक्रिय झाले आहेत. आपल्या न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, असं पत्रामध्ये म्हणण्यात आलं आहे.

निवृत्त न्यायमूर्तींनी पत्रामध्ये कोणत्या विशिष्ठ घटनांचा उल्लेख केलेला नाही. मात्र, सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरुन विरोधी नेत्यांवर कारवाई होत आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये वाद-प्रतिवाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर या पत्राला महत्व आलं आहे. काही दिवसांपूर्वी जवळपास दोनशे वकिलांना सरन्यायाधीशांना अशाच प्रकारचे पत्र लिहिले होते.

Share

Leave a Reply