पाणी टंचाईने भोसरीकर वैतागले

भोसरी – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही कमी दाबाने व विस्कळीत पाणीपुरवठा भोसरीकरांच्या पाचवीला पुजला आहे का असा संताप येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे. मागील काही दिवसांपासून कमी वेळ पाणी येणे, कमी दाबाने येणे, पाणीच न येणे, गढूळ पाणी अशा समस्येने भोसरी परिसरातील नागरिक तसेच महिला वर्ग हैराण आहेत.

भोसरी परिसरात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभाराचा फटका भोसरीकरांना सोसावा लागत आहे. भोसरी भागातील नागरिकांना मागील अनेक दिवसापासून पाणी समस्याला जावे लागत आहे. भोसरी परिसरात पाणीपुरवठा अत्यंत बेभरवशाचा झाला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून ठराविक वेळेत विभागवार पाणी सोडण्यात येते. यामध्येही सोडण्यास उशीर होतो. परंतु, बंद करण्याची वेळ मात्र कसोशीने पाळण्यात येते. काही कारणास्तव नेमून दिलेल्या वेळेत पाणी सोडण्यात आले नाही तर कामगार महिला वर्गाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने दुसर्‍या दिवशी नागरिकांना पाणीपुरवठा पासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र भोसरी परिसरात पाहावयास मिळत आहे. परिसरात अनेक ठिकाणी दाट लोकवस्ती असल्याने नगरपालिकेच्या पाण्याशिवाय अनेकांना दुसरा पर्याय नाही. मात्र पालिका प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

भोसरी गावठाण, चांदणी चौक, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, लांडगेनगर, सेक्टर क्रमांक एक, गुरुविहार, सद्गुरूनगर, चऱ्होली आणि परिसर भगतवस्ती, गुळवेवस्ती, सेक्टर क्रमांक चार, जय गणेश साम्राज्य या ठिकाणी पाणी पुरवठा गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत झाला आहे.


पालिकेने दिलेल्या वेळेत पाणी येत नाही. सर्वसामान्य माणसाने कोणाकडे तक्रार करायची . एक आठवड्यापासून या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कामाच्या शिप्टनुसार कामाला जाणाऱ्या तर यामुळे अनेकदा अंघोळ न करता
जावे लागते. या परिसरातील भागातील पाण्याचा प्रश्न तातडीने सुटणे गरजेचे आहे.

-रवींद्र शिंदे
रहिवासी, चांदणी चौक


भोसरी गवळीमाथा येथील पंपिंग विद्युत पॅनेल खराब झाले आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यावर अवलंबून असणाऱ्या भोसरीतील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे . असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत असले तरीही भोसरी परिसर गेल्या आठ दिवसांपासून विस्कळीत पाणी पुरवठयाला सामोरे जावे लागत आहे.

Share

Leave a Reply