पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक? काय म्हणाले अजित पवार 

पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक? काय म्हणाले अजित पवार 

पुणे : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन (ता. २९ मार्च रोजी) झाले. बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवार म्हणाले की, मला एक बातमी अशीही कळली आहे. मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे.

राजू शेट्टी यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका मांडल्यासंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता ते म्हणाले की, राजू शेट्टी म्हणाले मी स्वतंत्र उभा राहणार, ६ लोक उभे करेन. प्रत्येकजण आपापली भूमिका मांडतंय. सगळ्यांना जे काही बोलायचंय ते बोलू द्या. निवडणुका जाहीर होऊन निर्णय होईल तेव्हाच हे सगळं स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले.

सध्या काही जण हलक्या दर्जाची विधानं करतात. दर्जाहीन वक्तव्य करतात. याचा खरंतर आपल्या सगळ्यांनीच विचार करायला हवा, असंही अजित पवार म्हणाले.

Share

Leave a Reply