पुणे हादरले ! बिबवेवाडीत तरुणाचा निर्घृण खून

पुणे हादरले ! बिबवेवाडीत तरुणाचा निर्घृण खून

भीषण खुनाच्या घटनेने पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. बिबेवाडी परिसरात पूर्ववैमनस्यातून एकाचा निर्घृणपणे खून करण्यात आलाय. श्रीकांत मच्छिंद्र जाधव (वय -38 ,राहणार -राजीव गांधी नगर , बिबबेवाडी, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी तीन आरोपी विरोधात बिबबेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत जाधव हा सामाजिक कार्यकर्ता असून त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन दोन आठवड्यापूर्वी त्याने सुनील पारेकर यांच्या घरासमोर शिवीगाळ केली होती. त्यावेळी सुनील पारेकर यांनी श्रीकांत जाधव यास दारू पिऊन याठिकाणी शिवीगाळ करू नको असे सांगितले त्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा बुधवारी रात्री श्रीकांत जाधव दारू पिऊन बिबेवाडीतील डॉल्फिन चौकाजवळील हर्ष टेलर दुकानासमोर थांबलेला असताना, त्याचे सुनील पारेकरशी पुन्हा वाद झाले. यावेळी सुनील पारेकर व त्याच्या दोन साथीदारांनी मिळून श्रीकांत जाधव यास दगडाने ठेचून बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या श्रीकांत जाधव यास पोलिसांनी भारती हॉस्पिटल याठिकाणी उपचारासाठी दाखल केले. मात्र ,गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला आहे.

Share

Leave a Reply