पिंपरी – खराळवाडी, पिंपरी येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेला आज (शनिवारी) पहाटे अडीचच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागली होती. या आगीत कोणतीही जीवीत हानी नसली झाली तरी तरी कागदपत्रे ही जळून खाक झाली आहेत.
घटनेची माहिती बँकेच्या सुरक्षा रक्षकाने पिंपरी अग्निशमन दलाला दिली. वर्दि मिळताच पिंपरी फायर स्टेशनच्या दोन गाड्या या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या होत्या. यावेळेत बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे चार पर्यंत पुर्ण आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत बँकेची कागदपत्रे, मशीन असे मिळून 10 ते 15 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान वाढण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे.
हि कामगिरी पिंपरी अग्निशमन दलाचे जवान गौतम इंगवले, अमोल चिपळूणकर, विशाल फडतरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.