पिंपरी – चिखली,कुदळवाडी येथील नाल्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्या पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी पुणे शहर उपाध्यक्ष राजकुमार परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
‘चिखली कुदळवाडी येथील नाल्यात पर्यावरण यांत्रिकी विभागाने बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सांडपाणी प्रक्रीया प्रकल्पाचे कामकेले आहे ते बांधकाम ताबडतोब पाडून पर्यावरण विभागातील संबंधित अधिकारी वअभियंत्यांवर कारवाई करा.
चिखली, कुदळवाडी येथील नाल्या शेजारी बांधकाम करताना नाल्याच्या प्रवाहास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही असे पत्र पाटबंधारे विभागाने यांत्रिकीपर्यावरण विभागाला दिले आहे. मात्र पर्यावरण विभागाने सांडपाणी प्रक्रीय प्रकल्प चक्कनाल्यात 29 ते 30 पीलर टाकून केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात धोका निर्माण होवू
शकतो. त्यामुळे हे बांधकाम त्वरित पाडून त्याचा झालेला खर्च विभागाचे सबंधितअधिकारी व अभियंते यांच्या कडून वसूल करावा व अशा अनधिकृत बांधकाम करणाऱ्याअधिकारी व अभियंत्यावर कारवाई करावी. असे निवेदनात म्हटले आहे.