पिंपरी – बैल आणि शेतकऱ्यांचे जवळचे नाते सर्वश्रुत आहे.आज यांत्रिकीकरणामुळे जरी ट्रॅक्टर आणि यंत्राने शेती करत असलो तरी बैलपोळ्याचा सण शेतकरी उत्साहात साजरा करतो. बैलगाडा शर्यतीची ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपून पुढे नेण्याचे काम करण्याचे आवाहन महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बैलगाडा शौकिनांना केले.
नाणोली तर्फे चाकण (ता.मावळ) येथील हिंदकेसरी घाटात निमंत्रित ‘पुणे जिल्हा केसरी’ २०~२० बैलगाडा शर्यत पार पडली. यावेळी अजित पवार बोलत होते
आमदार सुनील शेळके,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील,पुणे पीपल्स बँकेचे संचालक, सहकार भूषण बबनराव भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,जिल्हा परिषद माजी कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बाबुराव वायकर, पीएमआरडीएचे सदस्य संतोष भेगडे आणि मान्यवर याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.
आगमनावेळी बैलगाडा घाटातून अजित पवार यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.फेटा बांधून,पुष्पगुच्छ आणि बैलगाडा शर्यतीचे शिल्प भेट देत बैलगाडा शर्यत आयोजकांतर्फे पवार यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अजित पवार पुढे म्हणाले कि, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांसह बैलगाडा शौकिनांच्या चेहऱ्यावर नाराजी होती.त्यानंतर केंद्र आणि राज्य पातळीवर प्रयत्न करून बंदी उठवल्यानंतर बैलगाडा शौकिनांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहायला लागला.बैल आणि शेतकऱ्यांचे जवळचे नाते सर्वश्रुत आहे.आज यांत्रिकीकरणामुळे जरी ट्रॅक्टर आणि यंत्राने शेती करत असलो तरी बैलपोळ्याचा सण शेतकरी उत्साहात साजरा करतो.याप्रसंगी बोलताना पवार यांनी कुठलेही राजकीय भाष्य करण्याची टाळले.