भवानी पेठ : टिंबर मार्केटमधील सात ते आठ गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी
पुण्यातील भवानी पेठेतील टिंबर मार्केट परिसरातील सात ते आठ गोडाऊनला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. पहाटे साडेचारच्या सुमारास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी याघटनेबाबत फोन आला. त्यानंतर पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे कॅन्टोन्मेंटच्या एकूण ३० अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरूवातीला लाकडाच्या गोदामाला आग लागली. त्यानंतर जवळच असलेल्या इतर गोदामांमध्ये पसरली. या घटनेत परिसरातील चार घरांनाही आग लागली आहे. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
“आमच्या अधिकार्यांनी प्रथम जवळपास १० एलपीजी सिलिंडर घटनास्थळावरून काढून टाकले. जेणेकरून आग जवळच्या वस्तीमध्ये आणि शाळेमध्ये पसरू नये. मात्र, आग अद्यापही सुरूच आहे. अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. सुमारे २० अधिकारी आणि १०० अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत”, असे अग्निशमन दल विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.