भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा ..संजय राऊत यांची कोणावर टीका?

मुंबई: टीम न्यू महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एका प्रचार सभेत इंडिया आघाडीचे नेते राहुल गांधी, लालू यादव आणि तेजस्वी यादव लालू यादव यांच्यावर गेल्या वर्षी पवित्र श्रावण महिन्यात मटण खाल्ल्याबद्दल हल्ला करत दावा केला की, या नेत्यांनी देशातील बहुसंख्य लोकांच्या भावनांचा अपमान केला आहे.

यावर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) नेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा मटण खाणे केव्हाही चांगले.

यावेळी संजय राऊत म्हणाले, गेल्या 10 वर्षांत मोदींचे नाणे घासून-पुसून गुळगुळीत झाले आहे. मोदींनी नोटबंदी करत 2000 हजरांची नोट रद्द केली. ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी. ती आता चालत नाही.

नरेंद्र मोदींचे तुम्ही कालचे वक्तव्य ऐकले आहे का? ते पराभूत मानसिकतेतून बोलत आहेत. काल मोदी असे म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेते हे मुघल प्रवृत्तीचे आहेत. ते श्रावणात मटण खातात. हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का? कोण मटण खातयं, कोण चिकण खातयं कोण फिश खातयं याचे काय करायचेय. देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराचा स्तर इतक्या खाली आणत असतील तर याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती वाटत आहे, असे राऊत म्हणाले.पंतप्रधान मोदी म्हणतात विरोधक मटण खातात. मोदींचा पक्ष स्वत:ला हिंदूत्त्ववादी समजतो पण बीफ निर्यात करणाऱ्या 5 कंपन्यांकडून साडेपाचशे कोटींचा निधी घेतला आहे. त्यावर त्यांनी बोलावे. मग कोण मटण खातयं आणि कोण भाजपच्या रुपाने साडेपाचशे कोटींचे गोमांस खातयं ते जनतेसमोर येईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपवर टीका केली

Share

Leave a Reply