मतदान यंत्र स्वीकृती केंद्राची निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या वतीने मतदान अधिकार्‍यांना एक दिवस आधी मतदान यंत्र व निवडणूक साहित्य वितरण व मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र स्वीकृती केंद्राचे ऑटो क्लस्टर येथील प्रदर्शन केंद्र क्रमांक 1 व 2 येथे नियोजन करण्यात आलेले आहे. या स्वीकृती प्रक्रियेची पाहणी मावळ लोकसभा मतदासंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिथी राजशेखर यांनी केली.

यावेळी पिंपरी विधानसभा संघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी नियोजनाची माहिती दिली. पिंपरी विधानसभा मतदासंघामध्ये 52 सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती केलेली आहे. 85 इमारतीमध्ये 400 मतदान केंद्र नेमून दिलेली आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान अधिकारी कर्मचारी यांची टीम मतदान केंद्रावर जाऊन मतदान केंद्राची रचना व इतर अनुषंगिक कामे पूर्ण करणार आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तिसरे प्रशिक्षण देवून साहित्य वितरण करण्यात येणार आहे

Share

Leave a Reply