महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर धडक कारवाई करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागातील 48 पत्राशेड असे 29 हजार 780 चौरस फुट क्षेत्र इतकी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. कारवाईचा धडका पाहून नागरिक स्वत:हून अनधिकृत पत्राशेड काढून घेतले जात आहेत.

 

‘ग’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. 27 कोकणे कॉर्नर ते नढे कॉर्नर नाल्या लगत अतिक्रमण कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये 4 पत्राशेड अंदाजे 2465 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाढण्यात आले. तसेच 8 पत्राशेड 6565 चौरस फुट अनधिकृत बांधकाम स्वत: नागरिकांनी काढून घेतले. ‘क’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत गट नंबर 100 आक्शा इलिजिंन्स सोसायटी समोर 18 मीटर डीपी रोड, गट नं.13, देहु आळंदी रोड चिखली बस स्टॉप आरक्षण व पोलीस स्टेशन आरक्षणावरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या कारवाई मध्ये 25 पत्राशेड असे 2950 चौरस फुट अनधिकृत बांधकामे पाडण्यात आले.

 

  1.  ‘ड’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत वाकड येथील छत्रपती चौक ते मानकर चौक परिसर रोडलगत अनधिकृत बांधकाम कारवाई करणायत आली. या कारवाई मध्ये 7 पत्राशेड एकुण अंदाजे 6300 चौरस फुट अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. ‘फ’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र.11 कुदळवाडी पिंटू यादव चौक ते अमित इंजिनिअरिंग येथे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या कारवाई मध्ये 4 पत्राशेड असे 5500 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. ‘ब’ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्र. 22 एम.एम.चौक काळेवाडी मध्य निष्कासित करण्यात आले. 4 पत्राशेड असे 6000 चौरस फुट अनधिकृत बांधकामे पाडण्यात आले.
Share

Leave a Reply