महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साजरी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, अभिजीत डोळस यांसह विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर निगडी येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास क्षेत्रीय अधिकारी सिताराम भवरे आणि विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, नगरसेवक सचिन चिखले,राजेंद्र लांडगे, कुंदन गायकवाड, प्रवीण भालेकर, नगरसदस्या सुमन पवळे, राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी शिवकुमार बायस, राणा अशोक इंगळे, विजयसिंह राजपूत, कैलाससिंह चव्हाण, अश्विनी राजपूत, डॉ.श्रीराम परदेशी, गणेश राजपूत, सुरेश सूर्यवंशी, आतिश राजपूत, सागर सिंह बघेल, संदीप चव्हाण, सतीश इंगळे तसेच निगडी पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, उप पोलीस निरीक्षक राजेंद्र बोरसे उपस्थित होते.

Share

Leave a Reply