मावळ लोकसभा मतदारसंघात पावणे तीन लाख मतदार वाढले

मावळ; टीम न्यू महाराष्ट्र

मावळ लोकसभा मतदारसंघात मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा 2 लाख 81 हजार 828 मतदार वाढले आहेत. त्यामुळे हे वाढलेले मतदार कोणाला कौल देतात, कोणाच्या पथ्यावर पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या 33 लाख 56 हजार 836 आहे. त्यात 23 जानेवारी 2024 पर्यंत नोंद केलेले 25 लाख 9 हजार 461 म्हणजेच 74.76 टक्के मतदार आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 25 एप्रिलपर्यंत मतदार नोंदणी करता येणार असल्याने मतदारसंख्या बदलू शकते. पुरुष मतदार 13 लाख 10 हजार 434, स्री मतदार 11 लाख 98 हजार 868 आणि इतर (तृतीयपंथी) 159 आहेत. मतदारसंघात एकूण 2 हजार 562 मतदान केंद्र आहेत.

मवळ लोकसभा निवडणूक मतदान केंद्रांसाठी 3 हजार 75 यंत्रांची आवश्यकता आहे. त्यांच्यासह राखीव मतदान यंत्र मिळून तीन हजार 594 यंत्र आहेत. इतकेच नियंत्रण यंत्र असून तीन हजार 819 व्हीव्ही पॅट यंत्र उपलब्ध आहेत. त्यांच्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय सहा ठिकाणी स्ट्रॉंग रूम तयार असून, मतदान झाल्यानंतर बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात सुरक्षा बंदोबस्तात ठेवली जाणार आहेत. तीन ते सहा मे या कालावधीत मतदान यंत्रे तयार केले जाणार आहेत. मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे 12 मे रोजी सर्व साहित्य दिले जाईल, त्यानंतर ते आपापल्या मतदान केंद्रावर जातील.

*13 लाख पुरूष तर 12 लाख महिला मतदार*

मावळ लोकसभा मतदार संघात 25 लाख 9 हजार 461 एकूण मतदार आहेत. यामध्ये 13 लाख 10 हजार 434 पुरूष तर 11 लाख 98 हजार 868 महिला मतदार आहेत. महिलांच्या तुलनेने 1 लाख 11 हजार 572 पुरूष मतदार जास्त आहेत.

*सहा मतदार संघात पावणेतीन लाख मतदार वाढले*

मावळ लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 22 लाख 27 हजार 633 मतदार होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 25 लाख 9 हजार 461 मतदार संख्या असल्याचे समोर आले. त्यामुळे गेल्या पाच वर्षात या मतदार संघात तब्बल 2 लाख 81 हजार 828 मतदारांची वाढ झाली आहे.

 

 

Share

Leave a Reply