मास्टर माइंड ग्लोबल शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

मास्टर माइंड ग्लोबल शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

पिंपरी दहावी सीबीएसई परिक्षेत मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेमधील दहा विद्यार्थी 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून अति विशेष प्रावीण्य श्रेणीत आले आहे. यामध्ये प्रथम क्रमांक सुप्राप्ती नाग 95.8 टक्के, द्वितीय क्रमांक उपासना जाधव 94.6 टक्के% तर तिसऱ्या क्रमांकावर निशांत भोइटे 93.8 टक्के हे विद्यार्थी आहेत.

सायली शिंगटे 93 टक्के,अर्थव देशपांडे 92.8.टक्के,अदिती पायघन 94.4 टक्के,सार्थक कोरडे 92.2 टक्के, निखिल गायकवाड 91.6 टक्के, भक्ती पराख 91.6 टक्के, अनुष्का सावळे 90 टक्के

हे विद्यार्थी अति विशेष प्राविण्य श्रेणीत आहेत.शाळेच्या संस्थापक जयश्री गवळी, मुख्याध्यापिका डॉ. प्रदीपा नायर , मनीकडंन नायर यांनी संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातील पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Share

Leave a Reply