मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात मुलीचा मृत्यू, पाच जण जखमी
पिंपरी :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव कारने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ३ च्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळ झाला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भरधाव कारने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी ३ च्या सुमारास उर्से टोल नाक्याजवळ झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे ३ च्या सुमारास MH12NJ2419 ही कार पुण्याच्या लेनवरून धावत होती. उर्से टोल नाक्याजवळ आली असता कारने MH12TV5039 या आयशर टेम्पोला धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळाताच आय. आर. बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि महामार्ग वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करत आहेत.