मोदी 75 रुपयांचे नाणे जारी करणार

मोदी 75 रुपयांचे नाणे जारी करणार

 दिल्ली : नव्या संसद भवनाचे २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची जोरदार चर्चा सुरू आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाची जय्यत तयारी केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्यात केंद्रीय अर्थ मंत्रालयानेही नव्या संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ७५ रुपयांचे नाणे जारी करण्याची घोषणा केली आहे.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, ७५ रूपयांचे नाणे गोलाकार असेल आणि त्याचे क्षेत्रफळ ४४ मिमी असेल. या नाण्याच्या बाजूला २०० शिळे बनवण्यात आले आहेत. हे नाणे ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल आणि ५ टक्के जस्त मिसळून तयार केले जाणार आहे. या नाण्यावर नवीन संसद भवनाचे प्रतिकात्मक चित्र छापलेले असेल.

नाण्यावर सत्यमेव जयते लिहिलेले असेल तसेच अशोकस्तंभही नाण्यावर कोरण्यात येईल. नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरी भाषेत भारत आणि इंग्रजीत इंडिया लिहिलेले असेल. त्याचप्रमाणे नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरी भाषेत संसद भवन लिहिलेले असेल आणि त्याचवेळी त्याच्या खाली नव्या संसद भवन संकुलाचे चित्र छापले जाईल. नाण्याची रचना राज्यघटनेच्या पहिल्या अनुसूचीनुसार करण्यात आली आहे.

Share

Leave a Reply