राज्यात अवकाळीचे सावट

मुंबई, टीम न्यू महाराष्ट्र

राज्यासह देशाच्या हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहे. राज्याच्या काही भागात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने 16 एप्रिल आणि 17 एप्रिलला उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत मात्र हवामान कोरडं राहणार असून काही भागात तापमान वाढीची शक्यता आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांत सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Share

Leave a Reply