मुंबई – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहेत. राष्ट्रवादीचे प्रतोद आणि आमदार अनिल पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आला आहे. अनिल पाटील यांनी शरद पवार यांना राजीनामा पत्र पाठवलं. ‘पवार साहेब तुम्हांला राजीनामा देण्याचा अधिकार कोणी दिला. असा सवाल उपस्थित केला आहे.शरद पवार यांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. किमान २०२४ च्या निवडणुका होईपर्यंत तरी राजीनामा देवू नका, अशी विनंती शरद पवार यांना केली आहे,’ असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.जितेंद्र आव्हाड यांनी दिला राजीनामा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. लोकांना मनातील निर्णय घ्यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.