मुंबई – शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर निवृत्त होणार, असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन नुकतचं यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलं. यावेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, अरुण गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शरद पवार आपल्या राजकीय आठवणींमध्ये रमले. ते म्हणाले, पहिल्यांदा लोकांनी वाचायला शिकलं पाहिजे, व्यक्ती वाचन हे तुमच्या सर्वांच्या ज्ञानात भर टाकणार असेल. माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार नगरच्या प्रवरा साखर कारखाण्यात कृषी अधिकारी होते. त्यांनी मला नगरला बोलावून रयत शिक्षण संस्थेसोबत काम करण्यास सांगितलं. १ मे १९६० रोजी माझी सार्वजनिक ६३ वर्षे पूर्ण झाली. त्यातील ५८ वर्षे मी राजकारणात राहिलो यानंतर आता केवळ तीन वर्षे राहिली आहेत.