राहुल गांधींना शिक्षा सुनावलेल्या न्यायधीशाचे प्रमोशन स्थगित

अहमदाबाद : गुजरातच्या ६८ न्यायाधीशांच्या पदोन्नतीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यात शिक्षा सुनावणारे न्यायाधीश हरीश वर्मा यांचेही नाव या न्यायाधीशांच्या यादीत आहे. अलीकडेच या सर्व न्यायाधीशांना पदोन्नती देण्यात आली. यानंतर गुजरात सरकारने या न्यायाधीशांच्या नियुक्तीचे आदेशही जारी केले होते.

प्रकरण काय आहे?

पदोन्नती प्रक्रियेत कमी गुण मिळालेल्या न्यायाधीशांच्या निवडीवरून गुजरातच्या दोन ज्युडिशियल अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयाने अवलंबलेल्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. ८ मे रोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी दिलेल्या निर्णयात सर्व न्यायाधीशांच्या पदोन्नतीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती.

Share

Leave a Reply