मुंबई – सुप्रीम कोर्टाने सत्ता संघर्षाच्या सुनावणीचा निकाल आता विधानसभेचेअध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. ते आज मुंबईत परतले आहेत.
यासंदर्भात बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका मांडली. आज ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी विमानतळावरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निकालवर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. याची प्रक्रिया किचकट आहे.
हा निर्णय पुर्ण चौकशी केल्यानंतरच कायद्याच्या तरतुदीनुसार निर्णय घेतला जाणार आहे, कोणत्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, आणि उशीर देखील केला जाणार नाही. आपण सगळ्यांनी आश्वासित रहा जो निर्णय घेतला जाईल तो कायद्याच्या तरतुदीनुसार आणि सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार योग्य निर्णय घेवू अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.