शरद पवार घेणार महत्वाची भूमिका; मुंबईत बैठक सुरु
मुंबई : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चेसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. पवारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु झाली आहे.
बैठकीचं औचित्य काय ?
वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. यामध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय रणनीती राहिल? तसेच सध्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार कसा सुरु आहे? तसेच राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीच चर्चा होणार आहे.