शिंदे – फडणवीस सरकारकडून कशी सुरू आहे महापालिका निवडणुकीची तयारी

मुंबई – लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांसह विरोधक कंबर कसत आहेत. दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सत्ताधाऱ्यांनी जनतेपर्यंत पोहचण्यासाठी कोट्यावधी खर्च करण्याची मोहिम आखली आहे.

येत्या दोन महिन्यांत ₹125 कोटींहून अधिक खर्च करून किमान 2.7 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याच्या निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे.

हिंदूस्तान टाईम्स वृत्तानुसार, येत्या दोन महिन्यांत १८ जुलैपर्यंत राबविण्यात येणार्‍या ‘शासन आपल्य दारी’ या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी राज्य सरकार तब्बल ५२.९१ कोटी खर्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी विशेष अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यांतील विकास कामांसाठी राखून ठेवलेल्या एकूण 15,150 कोटींपैकी 30 कोटी खर्च करण्यासाठी सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

अधिक निधी जमा करण्यासाठी, सरकारने आमदारांच्या क्षेत्र विकास निधीतून 70 कोटी काढण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक आमदाराला स्थानिक विकास कामांसाठी खर्च करावयाच्या 5 कोटींपैकी 20 लाखांपर्यंतच जनतेसाठी घेणाऱ्या कार्यक्रमासाठी वापरण्यास सांगितले आहेत.

अशाप्रकारे, शिंदे-फडणवीस सरकारने जनतेसोबत आपली नाळ घट्ट करण्यासाठी ₹125 कोटींची व्यवस्था केली आहे. राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदारांना आपल्या बाजून वळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

पाटण, सातारा येथे गेल्या आठवड्यात या मोहिमेच्या उद्घाटन समारंभात, राज्य सरकारने २७,००० हून अधिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि सरकारी कागदपत्रांचे वाटप केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भव्य कार्यक्रमात लाभार्थ्यांना धान्य व कृषी माल मोठ्या ट्रंकमध्ये देण्यात आला.

Share

Leave a Reply