शिरूरमधील दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार डमीच- छाया सोळंके-जगदाळे

पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र

शिरुर लोकसभा मतदारसंघातील दोन्ही राष्ट्रवादी गटाचे उमेदवार हे भोसरीकरांसाठी डमीच आहेत. कारण या दोघांनीही आपआपल्या खासदारकीच्या कार्यकाळात भोसरीकरांसाठी किंचीतही मदत केली नाही. यामुळे हे दोन्ही उमेदवार भोसरीतील जनतेसाठी, भोसरीतील मतदारासाठी डमीच उमेदवार आहेत, असा आरोप पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या अध्यक्षा व शिरुर लोकसभेच्या उमेदवार छाया सोळंके-जगदाळे यांनी केला आहे.

रेडझोनचा प्रश्न गेली २० वर्षापासून न सुटल्यामुळे येथील नागरीक अनेक जीवघेण्या संकटाला सामोरे जात आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी १० वर्ष या मतदारसंघाचे केंद्रात प्रतिनिधीत्व केले होते. पण मी समस्या मांडतोय, प्रश्न उपस्थित करतोय. याशिवाय त्यांनी भोसरीकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या रेडझोनच्या समस्या बाबत काहीही कार्य केलेले नाही. तीच परस्थिती डॉ.अमोल कोल्हे यांची सुध्दा आहे. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सभागृहात प्रश्न उपस्थित करण्याशिवाय ठोस असे रेडझोन बाबत काहीच धोरण अवलंबले नाही. तसेच हे दोन्ही उमेदवार हे भोसरी मतदार संघाच्या बाहेरचे असल्यामुळे त्यांना भोसरी मतदारसंघातील समस्या बाबत म्हणावा तसा जिव्हाळा नाही.भोसरीतील वाहतुक कोंडीची समस्या देखील जैसे थे असल्यामुळे हे दोन्ही उमेदवार भोसरी मतदार संघासाठी निष्क्रीयच आहेत. तसेच या पुढे देखील या पैकी कोणीही निवडून आले तरी भोसरीकरांच्या समस्या सोडवू शकणार नाहीत. हे आता प्रर्यंतच्या त्यांचा कारकिर्दीतून भोसरीतील मतदारांनी पाहिले आहे. यामुळे मतदारांनी या दोघांनाही पुन्हा मते देऊन आपला स्वाभिमान गहान टाकू नये.

रेड झोनमुळे कामगार वर्गांची होते आर्थिक पिळवणूक..

भोसरी मतदारसंघातील अर्ध्याच्यावर परिसर हा रेड झोनने बाधित आहे. या परिसरात ३ लाखाच्या वर नागरीक वास्तव्यास आहेत. रेडझोनमुळे येथील शेतकरी व त्यांच्या आनेक पिढ्या दिशाहिन व बेरजागार झाल्या आहेत. तसेच अनेक कामगार वर्गांनी बांधलेल्या या परिसरातील घरांच्या विवीध प्रकारच्या करा मुळे महापलिकेच्या टॅक्समुळे आयुष्यातील कष्टाची आर्धी कमाई ही विविध दंड शास्तीकर, विलंब दंड व टॅक्स भरण्यातच जात आहे. हे करुनसुध्दा नेहमीच घरे पाडण्याची टागती तलवार ही त्यांच्या डोक्यावर सततच असते. तर अनेक उद्योजक, नागरीक यांनी कोट्यावधी व लाखो रुपये खर्च करुन उभी केलेली शेड असेल किंवा इमारती असतील हे सुध्दा या रेडझोनमुळे पाडून महापालिका प्रशासनाने मातीमोल केले आहेत. या सर्व प्रकाराला हे नाकार्ते खासदार जबाबदार असून या मतदार संघात इतरही अनेक समस्या आहेत. त्या देखील सोडविण्यात यांना पुर्णपणे अपयश आले आहे. यामुळे मतदारानी यांना कायमचे घरी बसवावे व मला मते देऊन ही समस्या सोडविण्यासाठी अवश्य संधी द्यावी.

– छाया सोळंके-जगदाळे,
उमेदवार शिरुर लोकसभा

Share

Leave a Reply