चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावर एका शेतकऱ्याने आपल्याला न्याय मिळावा यासाठी रस्ता अडवून आंदोलन केले आहे. त्याच्या एकट्याच्या आंदोलनामुळे रस्ता अडला असून वाहतूक कोंडी झाली आहे. आपल्याला न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी हे आंदोलन थांबवणार नाही असा इशाराही या शेतकऱ्याने दिला आहे.
अधिक माहितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणच्या कामथे येथे हे आंदोलन करण्यात आले आहे. सदर शेतकरी प्रकल्पग्रस्त असून त्याने आपल्याला मोबदला मिळाला नसल्याचा आरोप केला आहे. जोपर्यंत मला याचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत मी रस्त्यावर बसून राहणार आहे असं त्याने सांगितलं आहे.