मुबंई – सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल लागला. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा दिला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आलं आहे. तर व्हीपसंदर्भात शिंदे सरकारला कोर्टाने फटकारले आहे. यासर्व निर्णयानंतर मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे मीरा भाईंदर दैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर बोलताना संभ्रम असल्याचे म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
कोर्टाची भाषा लक्षात येत नाही. संभ्रमात टाकणारी असते. त्यामुळे कालचा कोर्टाचा निकाल हा संभ्रमात आहे. काल कोर्टाने विधीमंडळातील हा गट पक्ष म्हणून मानला जाणार नाही. बाहेरचा जो आहे तोच पक्ष समजला जाणार.
आता निवडणुक आयोगाने चिन्ह आणि नाव हे शिंदे गटाकडे गेलं आहे. आता निवडणुक आयोग काय करणार? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.