शिंदे-फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचा विजय झाला आहे. या निकालावर आम्ही समाधानी आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या या निकालावर आम्ही पूर्ण समाधान व्यक्त करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपण विजय झाला आहे. हा जो काही निकाल आहे त्यातील चार पाच जे महत्वाचे मुद्दे आहेत. त्यांपैकी पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरलं आहे.कारण उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवता येणार नाही. दुसरं त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलं आहे की, अपात्रतेचा सर्व अधिकार अध्यक्षांना आहेत. अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याचे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांच्याविरोधात खटला दाखल आहे त्यांना सध्या पूर्ण अधिकार आहेत, असंही कोर्टानं म्हटलं आहे. तसेच जे काही सभागृहाचं कामकाज चालेल त्यामध्ये अपात्रेचा काहीही परिणाम होणार नाही.तसेच निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार आहेत हे देखील कोर्टानं म्हटलं आहे. आयोग स्वतंत्रपणे यावर निर्णय घेऊ शकतं. त्यामुळं आयोगाच्या निर्णयावर उद्दव ठाकरे गटाकडून जे दावे करण्यात आले होते ते पूर्णपणे चुकीचं असल्याचं सिद्ध झालं आहे.निवडणूक आयोग स्वतंत्र निर्यण घेऊ शकतं. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने केलेले आरोप चुकीचे आहेत, असे कोर्टाने म्हटल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्ष कुठला हे ठरवण्याचे अधिकार देखील विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळं याही बाबतीत स्पष्टपणे अधिकार अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळं हे सरकार पूर्णपणे संविधानिक बनलं आहे. कारण काही जणांना यावर शंका होती त्यामुळं त्यांच्या शंकेच निकालामुळं समाधान झालं असेल.भाजप सोबत निवडून आलात आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेला तेव्हा नैतिकता कुठे गेली होती. नैतिकतेच्या गोष्टी सांगू नका, कारण तुम्ही खुर्चीसाठी नैतिकता सोडली एकनाथ शिंदेंनी विचारांसाठी काम केलं. तुमच्याकडं आकडा नाही त्यामुळं तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी करु नका, असा टोला देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.