स्व. माजी आमदार सुरेश गोरेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची खेड तालुक्यात हजेरी

स्व. माजी आमदार सुरेश गोरेंच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची खेड तालुक्यात हजेरी

चाकण – खेडचे माजी आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांच्या कन्येचा विवाह सोमवारी २२ मे २०२३ रोजी आळंदी जवळ चर्होली येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नाच्या आदल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे मा.खासदार शिवाजीरावआढळराव पाटील यांनी स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या चाकण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे आणि श्रीमती.मनिषताई सुरेशभाऊ गोरे यांची कन्या चि.सौ.कां.कल्याणी आणि श्री.हरिष दत्तात्रय घोरपडे यांचे सुपुत्र चि.किरण यांना त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा व शुभाशिर्वाद दिले. माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे यांनी देखील गोरे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली.

लग्नाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव, आमदार दिलीप मोहिते, माजी आमदार राम कांडगे, शरद सोनवणे यांच्यासह सर्व पक्षीय अनेक मान्यवरांनी यावेळी आवाजून हजेरी लावत शुभाशीर्वाद दिले. खूप मोठ्या संखेने नागरिकांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. विवाह सोहळ्यास आलेल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र प्रदूषण नियत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, बाजार समितीचे संचालक माणिक गोरे आदींनी केले. सोमवारी विवाह सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, गोरे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply