‘हा आमचा घरातला प्रश्न – शरद पवार 

मुंबई -हा आमच्या घरातला प्रश्न आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत ‘वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.’ असा आरोप केला होता. त्यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

सामना अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी संजय राऊत यांना चांगलच फटकारलं आहे. ‘आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे’, असे म्हणत पवार यांनी राऊत यांना सुनावलं.

 

 

काय म्हणाले शरद पवार

 

लोकांनी मला थांबू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाही.पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो. आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे, अशा शब्दात शरद पवार यांनी राऊत यांना उत्तर दिलं.

Share

Leave a Reply