२ महिन्यात कसा घेऊ? – नार्वेकर

 

मुंबई – सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचे प्रकरण संपले असले. तरी राज्यातील राजकारण थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. मर्यादित कालावाधीत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने २ महिन्यात निर्णय घ्यावा, असा अल्टीमेटच राहुल नार्वेकर यांना दिला आहे. मात्र नार्वेकर यांनी मी चौकशी पूर्ण झाल्यावरच निर्णय घेणार. न्यायालयाला निर्णय घ्यायला १० महिने लागले मी २ महिन्यात निर्णय कसा घेऊ, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

ठाकरे गटाचं कोणतही निवेदन माझ्याकडे आलं नाही. १६ आमदारांच्या अपात्रतेवर निपक्षपाती निर्णय घेणार. हा निर्यण घेताना दिरंगाई करणार नाही आणि घाईही नाही, असे नार्वेकरांनी स्पष्ट केले.

राहुल नार्वेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. नार्वेकर म्हणाले, “विधानसभेत राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोण करतो हे मला आधी पाहावे लागेल. त्यानंतर मुख्य व्हीपच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल. आमदारांच्या अपात्रतेच्या याचिका सभापतीकडे प्रलंबित आहेत. त्यांचा मुख्य वाद व्हीपच्या आदेशाचे पालन न करण्याबाबत आहे.

१६ आमदारांच्या निलंबनाला विलंब करणे, हा द्रेशद्रोह असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावक नार्वेकर यांनी देखील पलटवार केला आहे. धमक्या दिल्यानंतर मी दबावात येईल, असं कुणाला वाटत असेल. तर तो गैरसमज आहे, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. माझ्याकडे ५४ आमदारांविरोधात ५ याचिका आहेत. याबाबत लवकर निर्यण घेणार आहोत, असे देखील नार्वेकर म्हणाले.

Share

Leave a Reply